Breaking News

मिताली राजचा टी-20 क्रिकेटला अलविदा

Mitali Raj
नवी दिल्ली
महिला क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडू म्हणून ओळखली जाणारी भारताच्या मिताली राजने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे मिताली आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. 36 वर्षीय मिताली आता एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेवर लक्ष देणार आहे. तिने 32 टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये तीन टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धांचा समावेश आहे. तिने 2012, 2014 आणि 2016 च्या टी -20 विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. मात्र, तिच्या नेतृत्वाखाली भारताने एकदाही विश्‍वकरंडक उंचावलेला नाही.88 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये मितालीने 2364 धावा केल्या आहेत. या धावा करताना 37.52 ची तिची सरासरी राहिली आहे. या धावांमध्ये मितालीच्या 17 अर्धशतकांचा समावेश आहे.