Breaking News

विनोदोत्तम करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धां 23 सप्टेंबरपासून प्रारंभ

पुणे
 यंदाची विनोदोत्तम करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा सोमवार दिनांक 23 सप्टेंबर ते गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर 2019 या कालावधीत होणार असून या माध्यमातून रसिकांना हास्यजल्लोषाची पर्वणी मिळणार आहे, अशी माहिती विनोदोत्तम करडंकचे संस्थापक हेमंत नगरकर यांनी कळवली आहे. गेल्या बारा वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे स्पर्धेचे तेरावे वर्ष असून स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद वाढतोच आहे.
भरत नाट्यमंदिरात होणारी ही स्पर्धा सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.00 (पाच) वाजता, भरत नाट्य मंदिर, पुणे इथं स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होईल. ज्येष्ठ नाट्यकर्मी, लेखक योगेश सोमण यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. यावेळी सिद्धेश्‍वर झाडबुके आणि अदिती द्रविड यांना विनोदवीर पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ ध्वनी प्रकाश तंत्रज्ञ मुकुंद फडकले यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विनोदोत्तम करंडक 2019 स्पर्धेतील सर्वोत्तम तीन एकांकिकांचे सादरीकरण शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत भरत नाट्य मंदिर, पुणे इथं होणार आहे.