Breaking News

वेस्ट इंडिज फॉलोऑनच्या छायेत ; 7 बाद 87 धावांवर डाव गडगडला

भारताचा पहिला डाव 416 धावांवर आटोपला

हनुमा विहारीचे शतक तर इंशात शर्माचे पहिलेच अर्धशतक

जमैका
भारत आणि विंडीज यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहनं जबरदस्त मारा करत विंडीजच्या फलंदाजांची झोप उडवली. त्यानं हॅटट्रिकसह 6 गडी बाद केले. बुमराहनं त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हॅटट्रिक नोंदवली. अशी कामगिरी करणारा बुमराह भारताचा तिसराच गोलंदाज आहे.
विंडीजविरुद्ध कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारताचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर बुमराहनं विंडीजच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. बुमराहनं त्याच्या चौथ्या षटकांत सलग तीन गडी बाद करून कारकिर्दीतील पहिली हॅट्ट्रिक केली.  विंडीजविरुद्ध कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारताचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर बुमराहनं विंडीजच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. बुमराहनं त्याच्या चौथ्या षटकांत सलग तीन गडी बाद करून कारकिर्दीतील पहिली हॅट्ट्रिक केली.  विंडीजविरुद्ध कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारताचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर बुमराहनं विंडीजच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. बुमराहनं त्याच्या चौथ्या षटकांत सलग तीन गडी बाद करून कारकिर्दीतील पहिली हॅट्ट्रिक केली. भारतीय संघाने पहिल्या डावात 416 धावा केल्यानंतर दुसर्‍या दिवसअखेर विंडीजची अवस्था 7 बाद 87 अशी दयनीय झाली. जसप्रीत बुमराहने हॅटट्रीक घेत दुसर्‍या कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत करण्यास भारताला मदत केली. भारताला हनुमा विहारीच्या दमदार शतकाच्या बळावर 400 पार मजल मारता आली. हनुमा विहारीचे हे कसोटी कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले. महत्वाचे म्हणजे त्याने त्याच्या या शतकाचे श्रेय वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दिले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मी 42 धावांवर नाबाद होतो. दुसर्‍या दिवशी मैदानावर जाऊन मोठी धावसंख्या उभारायची हे माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे त्या रात्री मला नीट झोप लागली नाही. पण दुसर्‍या दिवसाच्या खेळात शतक ठोकल्यानंतर फार चांगलं वाटलं. आनंद झाला. माझ्या या शतकाचं श्रेय इशांतलादेखील आहे. तो मैदानावर आला, तेव्हा त्याने उत्तम खेळ केला. (त्याने साथ दिली आणि तो खेळपट्टीवर तग धरून उभा राहिला म्हणून मला शतक करणे शक्य झाले. तो नसता, तर मला शतक झळकावताच आलं नसतं, असे सांगत त्याने इशांतला या शतकाचे श्रेय दिलं. हनुमा विहारीने कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक ठोकले. त्याने 111 धावांची सुंदर खेळी करून दाखवली. त्याने कारकिर्दीतील सहाव्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला. याशिवाय, इशांतनेही आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले. त्याने 80 चेंडूत 57 धावांची दमदार खेळी केली. मधल्या फळीत शेमरॉन हेटमायरने कर्णधार जेसन होल्डरच्या साथीने छोटेखानी भागीदारी रचत विंडीजचा डाव सावरला. मात्र हे दोन्ही फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. त्यामुळे तिसर्‍या दिवशी विंडीजचे फलंदाज फॉलोऑन किती वेळ टाळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

जसप्रीत बुमराहचा विक्रम
जसप्रीत बुमराहने हॅटट्रीकची नोंद करत वेस्ट इंडिजचा निम्मा संघ माघारी धाडला. गोलंदाजीत बुमराहने 16 धावांत 6 बळी टिपले. जसप्रीत बुमराहने विंडीजच्या डावाला खिंडार पाडत, यजमान संघाला बॅकफूटवर ढकललं. ब्राव्हो, ब्रूक्स आणि रोस्टन चेस या तिन्ही फलंदाजांना माघारी धाडत हॅटट्रीकची नोंद केली. दुसर्‍या दिवसाअखेरीस भारताकडे अजुनही 329 धावांची आघाडी आहे, त्यामुळे जमैका कसोटी डावाने जिंकण्याची चांगली संधी विराट कोहलीच्या भारतीय संघाकडे असणार आहे.