Breaking News

जवळा विद्यालयचा कब्बडी स्पर्धेत प्रथम क्रमांक

जामखेड/प्रतिनिधी
 जवळा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयातील 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. व जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
 तसेच याच विद्यालयातील 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेचे आयोजन भैरवनाथ विद्यालय शिऊर येथे पार पडले. या दोन्ही संघाचे विद्यालयातील मुख्याध्यापक पाठक, परिवेक्षक पवार व सर्व शिक्षकांनी गावकर्‍यांनी विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक रोही, भंडारे तसेच नवयुग कब्बडी क्लब यांचे विशेष सहकार्य लाभले. 17 वर्ष वयोगटातील संघाचे रेडर म्हणून कार्तिक हजारे, अमित लेकुरवाळे, यांनी संघाची धुरा सांभाळली. व कार्तिक अशोक हजारे कर्णधार, शंतनू वाळुंजकर, आदित्य पठाडे, तुषार मते, लेकुरवाळे अमित, आदित्य रोडे, अनिकेत हजारे, फसले शंतनू, स्वपनिल कुंभार, ओंकार दळवी, युराज मातणे, धर्मराज पवार यांनी मोलाची साथ दिली.