Breaking News

सामाजिक बांधिलकी जपणे महत्वाचे : घुले

घोटण/प्रतिनिधी :
राजकारणविरहित असलेली सामाजिक बांधिलकी जपणे हे खूप महत्त्वाचे आहे. स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटलांपासून ते आजपर्यंत विशेष प्रेम खानापूर रहिवाशांवर सातत्याने आम्ही ठेवत आलो आहोत. विविध योजनांच्या माध्यमातून अनेक विकास कामे या भागांमध्ये केले आहेत. यापुढे असेच कामे करून गावाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहू असे प्रतिपादन शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी केले.

 खानापूर येथील रुद्र प्रतिष्ठान गणेश मंडळ आयोजित सांस्कृतिक लोकनाट्य कार्यक्रम प्रसंगी   घुले बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती शिवाजीराव नेमाने, मंगेश थोरात, सरपंच अण्णासाहेब जगधने, ताहेर पटेल, ज्ञानेश्वर थोरात, संतोष पावशे, ग्रामपंचायत सदस्य राम गोरे, संदीप मोटकर, अक्षय थोरात आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.