Breaking News

सुरोडीत 35 हजारांची घरफोडी

कोळगाव/प्रतिनिधी  
श्रीगोंदे तालुक्यातील सुरोडी येथे संजय वागस्कर यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 35 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 या बाबत सविस्तर असे की, श्रीगोंदे तालुक्यातील सुरोडी येथील रहिवासी संजय वागसकर हे सोमवारी (दि.9) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदे येथे बाजार आणण्यासाठी त्याच्या पत्नी समवेत गेले होते. त्यावेळी बंद असलेल्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून घरातील कपाटमधून 20 हजार रुपये किमतीचे गंठण, सहा हजार रुपये किमतीचे कानातील कर्णफुले, दोन हजार रुपये किमतीची नथ, दोन हजार रुपये किमतीचे मनी, व पाच हजार रुपये असे एकूण 35 हजार रुपयांची घरफोडी झाल्याचा  मंगळवारी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ाहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित करीत आहेत.