Breaking News

आत्माभिमुख साधनेने मनाला निर्मळता:मिरीकर


कोपरगाव / ता.प्रतिनिधी

 आत्मा आणि परमात्मा यांचे एकरूपत्व निर्विकार दृष्टीने न्याहाळता आले की माणसाला परमेश्वराच्या अस्तित्वाचा साक्षात्कार होतो. आत्माभिमुख साधना मानवी मनाला आतून बाहेरून निर्मळ बनविते असे  प्रतिपादन हभप मीराबाई मिरीकर यांनी केले.

 संवत्सर येथे ऋषिपंचमीनिमित्त गोदावरीच्या काठावरील श्री शंगऋषींच्या मंदिराजवळ महिलांनी स्नानाची पर्वणी साधली. यानिमित्त शनी मंदिराच्या प्रांगणात हभप मीराबाई मिरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. हभप सोपानकाका करंजीकर, माऊली महाराज, सुराशे महाराज, भानुदास महाराज बोळीज, वाल्मिक महाराज जाधव आदी उपस्थित होते. प्रारंभी गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी ग्रामस्थांच्या वतीने मीराबाईंचा सत्कार करून उपस्थितांचे स्वागत केले.

 ऋषीपंचमीनिमित्त गोदावरी नदीत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी महिलांनी गर्दी केलेली होती. समाधानकारक पावसामुळे यंदा नदीला पाणी वाहत असल्यामुळे संपूर्ण गोदाकाठ भक्तीमय झालेला होता. औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर अशा विविध ठिकाणावरुन येत भाविकांनी ही पर्वणी साधली.