Breaking News

चांद्रयातूमधून लँडर विक्रम यशस्वीपणे झाले विलग

बंगळूर
भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान 2 मोहिमेचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. आज दुपारी एक वाजून 15 मिनिटांच्या सुमारास मुख्य यानातून लँडर विक्रम यशस्वीपणे वेगळे झाले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. आता खर्‍या अर्थाने चांद्रयान -2 चा टप्पा सुरू झाला, असे म्हटले जात आहे. चांद्रयानमधून वेगळ्या झालेल्या लँडरमधून रोव्हर विक्रम येत्या सात सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार आहे. चांद्रयान - 2 ने यापूर्वीच चंद्राच्या पाचव्या कक्षेत प्रवेश केला आहे. आज चांद्रयान 2 मधून लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान वेगळे झाले.