Breaking News

जग धोक्याच्या उंबरठ्यावर

   संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील हवामानात होणार्‍या बदलांचा अभ्यास करणार्‍या इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेंट चेंज (खझउउ) या संस्थेचा अहवाल प्रकाशित झाला आहे. या अहवालामध्ये माणूस आणि नैसर्गिक पर्यावरणावर हवामानातील बदलांच्या परिणांमाची अभ्यासपूर्ण मांडणी केली असून, या बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी संभाव्य उपाययोजनांविषयी माहिती देण्यात आली आहे. जपान येथील योकोहोमा या शहरामध्ये पाच दिवसांच्या परिषदेमध्ये या अहवालाला अंतिम स्वरुप देण्यात आले. हवामानातील बदलाचे परिणाम पृथ्वीतलावरील प्रत्येक घटकावर आणि समुद्रावर मोठ्या प्रमाणात दिसून येत असून, या धोक्यापासून वाचण्यासाठी जग तेवढे तयार किंवा तत्पर नसल्याचे मत या संशोधकांच्या गटाने व्यक्त केले आहे.
     उष्णतेची लाट, दुष्काळ, पूर परिस्थिती,चक्री वादळे आणि वणवे यांसारख्या घटनांमध्ये गेल्या दशकामध्ये वाढ होत असून, त्याचे पर्यावरण आणि मानवी जनजीवनावर विपरित परिणाम होत आहेत. गरीब लोकांच्या आयुष्यावर या बाबींचा मोठा परिणाम होणार असून, त्यांच्या हालअपेष्टांमध्ये भर पडणार आहे. या अहवालाला अंतिम स्वरुप देणार्‍या संशोधकांच्या गटाचे सहसदस्य व्हिसेन्टे बारोस यांनी सांगितले, की मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होत असलेल्या हवामानबदलाच्या कालखंडामध्ये आपण राहत आहोत. त्याचा सर्वाधिक धोका मानवी सुरक्षेला आहे. त्यामुळे सर्वाधिक नुकसान घरे, स्थावर मालमत्ता यांना होणार असून, अन्न आणि पाण्याच्या समस्येमध्ये वाढ होणार आहे. त्याचे पर्यवसान स्थलांतरितांच्या संख्येमध्ये वाढ होण्यात होत आहे. या प्रकारच्या घटनांना सामोरे जाण्यासाठी आपण अद्याप तयार नसल्याचे स्पष्ट होते.
     आयपीसीसीचे सदस्य राजेद्र पचौरी यांनी सांगितले, की या पृथ्वीतलावरील कुणीही हवामान बदलाच्या परिणामापासून अलिप्त राहू शकणार नाही. सध्या या परिणामाशी जुळवून घेणे आणि प्रमाण कमी करणे, इतकेच आपल्या हाती आहे. त्यातूनच हवामानबदलाचे धोके कमी करणे शक्य आहे. जर पूर्व औद्योगिक पातळीच्या तापमानामध्ये चार अंश सेल्सिअसची वाढ झाल्यास हवामानबदलाचे धोके हे अधिकपासून उच्चतम मर्यादेच्या पलीकडे जातील. तापमानामध्ये 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास धोक्यांच्या प्रमाणात वाढ होणार आहे. भूतकाळातील घटनांचा मागोवा घेत भविष्यातील बदलांसाठी तयार राहण्याकडे आपले अधिक लक्ष असले पाहिजे. या बदलांशी जुळवून घेण्यातून धोक्यांचे प्रमाण कमी होऊ शकेल, असे मत ख्रिस फिल्ड यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, की विविध देशांतील शासन, संस्था आणि जगभरातील समुदाय त्यांच्या अनुभव आणि अभ्यासावर आधारित हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या अनुभवातून पुढील मार्ग दिसण्यास मदत होईल. अधिक महत्त्वाकांक्षी सुधारणांसाठी हवामान आणि समाजामध्येही बदल होणे आवश्यक आहेत. ‘ग्रीनपीस इंटरनॅशनल’चे अधिकारी कैसा कोसोनेन यांनी सांगितले, की सध्या आपण एका अरुंद चिंचोळ्या रस्त्यावरून मार्गक्रमण करीत आहोत. हवामानातील बदलाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हवामानातील प्रदूषणामुळे मानवी सुरक्षेबरोबरच सागर आणि जंगले व त्यांतील विविध प्रजातींना धोका पोचत आहे. हे टाळणे शक्य असून, या प्रजाती नष्ट होण्यापासून वाचविता येतील.
’आयपीसीसी’ने प्रसारित केलेल्या अंतरिम अहवालामध्ये मानवाला जागतिक तापमानवाढीसाठी प्राथमिक दृष्ट्या कारणीभूत ठरवले होते. या तापमानातील वाढीमुळे अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होत असून, बर्फ वितळत आहे. हा ‘आयपीसीसी’चा दुसरा अहवाल असून, ‘मिटिगेशन ऑफ क्लायमेंट चेंज’ या विषयावरील बर्लिन येथील तिसरा अहवाल तितकाच महत्वपूर्ण आहे. पॅरिस (फ्रान्स) येथे 2015 मध्ये नव्या आंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक नियमांच्या निर्मितीसाठी परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या नियमांनी 2012 मध्ये मुदत संपलेल्या 1997 च्या क्योटो प्रोटोकॉलची जागा घेतली.
     हवामानातील बदलाचे मापन करण्यासाठी सरळ निरीक्षणे आणि उपग्रहाच्या माध्यमातून व विविध व्यासपीठांवरुन मिळवलेल्या माहितीचा वापर केला गेला.
 गेल्या चौदाशे वर्षांच्या कालखंडामध्ये 1983 ते 2012 हा तीस वर्षांचा कालखंड सर्वाधिक उष्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. 1850 पूर्वीच्या तापमानाच्या तुलनेमध्ये गेल्या तीस वर्षांमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान सातत्याने वाढत आहे.
 समुद्राच्या पातळीमध्ये 1901 ते 2010 या कालावधीमध्ये जागतिक सरासरी पातळीमध्ये 0.19 (0.17 ते 0.21) मीटर वाढ झाली आहे.
 प्रदूषणाच्या प्रमाणामध्ये झालेली वाढ - वातावरणातील कार्बन डायऑक्साईड (40 टक्के), मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड तीव्रतेमध्ये वाढ झाली आहे. यांपैकी सुमारे 30 टक्के कार्बन डायऑक्साईड समुद्रामध्ये शोषला गेला असून, सागराच्या आम्लीकरणामध्ये वाढ झाली आहे.
     जागतिक तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सियसच्या खाली ठेवण्याच्या उद्दिष्टापासून जग पूर्णपणे भरकटलं आहे. आणि आता जागतिक तापमानवाढीची वाटचाल 3 डिग्री सेल्सियसकडे होत असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. जागतिक तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सियसच्या खाली ठेवण्याचं उद्दिष्ट गाठायचं असेल तर आपल्याला ऊर्जेच्या वापराबाबत वेगवान, दूरगामी आणि अभूतपूर्व बदल करावे लागतील, असं म्हटलं जात आहे. या गोष्टीची खूप मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल. पण तितक्याच प्रमाणात आपल्याला संधी असल्याचं देखील म्हटलं जात आहे. 2उ हे उद्दिष्ट ठेवण्यापेक्षा 1.5उ हे उद्दिष्ट ठरवणं, हे खूप अर्थानं फायद्याचं आहे. हवामान बदलाच्या परिणामासंबंधी महत्वपूर्ण बदल घडतील असं प्रा. जिम स्किया यांनी म्हटलं आहे. ते खझउउचे सह-अध्यक्ष आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर 1.5उचं उद्दिष्ट गाठायचं असेल तर आपण ऊर्जेचा वापर कसा करतो, आपण जमीन कशी वापरतो आणि आपली वाहतूक व्यवस्था कशी असावी, याबाबत आपल्याला अमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील.
     या अहवालात नोंद घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. हा अहवाल असा आहे की वैज्ञानिकांना, ’-उढ छजथ, खऊखजढड’ असं लिहावंसं वाटत असेलही. पण त्यांना ही गोष्ट तथ्य आणि आकडेवारीसह मांडावी लागणार आहे,असं कैसा कोसोनेन यांनी म्हटलं आहे. कैसा या ग्रीनपीस संघटनेशी संबंधित आहेत आणि त्यांनी या वाटाघाटींचं निरीक्षण केलं आहे. तथ्य आणि आकडेवारीचा वापर करुन वैज्ञानिकांनी जगाला धोकादायक तापाची लागण झाली आहे याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला असं वाटत होतं की जर आपण 2उचं उद्दिष्ट यशस्वीरीत्या गाठू शकलो तर हवामान बदलाचे परिणाम हे आटोक्यात राहतील. पण या अहवालानं आपले डोळे उघडले आहेत. या अहवालात स्पष्टपणे सांगितलं आहे की जर तापमान 1.5उनं वाढलं तर यामुळे पृथ्वीचं आरोग्य धोक्यात जाईल आणि 1.5 ची मर्यादा आपण फक्त 12 वर्षांत ओलांडणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे. म्हणजेच 2030 नंतर पृथ्वीच्या तापमानात 1.5उ वाढ होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. आपण याखाली येऊ शकतो. पण त्यासाठी आपल्याला अत्यावश्यक बदल तातडीनं घडवावे लागतील. यासाठी खूप मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. पुढील वीस वर्षांसाठी पूर्ण जागतिक सकल उत्पन्न तसेच वस्तू आणि सेवांवर मिळणार्‍या उत्पन्नातील 2.5 टक्के रक्कम दरवर्षी आपल्याला गुंतवावी लागेल तर हे उद्दिष्ट गाठता येईल.
     असं झालं तर आपल्याला अशी उपकरणं आणि यंत्रे लागतील जी वातावरणातल्या कार्बनला कैद करु शकतील. मग हा कार्बन आपण खोल जमिनीत साठवून ठेवू. असं घडलं तरच हे आटोक्यात येईल.

- प्रदिप जानकर