Breaking News

शिरपूर स्फोटप्रकरणी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

धुळे
शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत 31 ऑगस्टला झालेल्या भीषण स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला आहे, 70 जण जखमी झालेत. या प्रकरणी पोलिसांनी फॅक्टरी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या घटनेला जवळपास 20 तास उलटूनही अद्याप फॅक्टरीचा कोणताही जबाबदार अधिकारी समोर आला नाही.
शिरपूर शहराजवळ असलेल्या वाघाडी गावात असलेल्या रुमित केमिकल फॅक्टरीचा बॉयलर फुटल्याने सकाळी दहाच्या सुमारास हा स्फोट झाला. त्यात 13 जणांचा मृत्यू झाला. या फॅक्टरीतील सर्व कामगार हे मध्यप्रदेश, गुजरातमधील आदिवासी भागात राहणारे होते,अशी माहिती आहे. फॅक्टरीत व्यवस्थापनाने सुरक्षेच्या दृष्टीनं काही उपाययोजना केल्या होत्या का याबाबतची अजून कळली नाही. पोलिसांनी फॅक्टरी व्यवस्थापनाविरोधात सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला फॅक्टरीत मोठा आवाज झाला. त्यानंतर आगीचे लोळ बाहेर पडायला सुरुवात झाली. आग लागल्यानंतर एका विशिष्ट रसायनाचा वास बाहेर पडायला लागला. त्यामुळे अनेकांचे जीव हे वासाने गुदमरुन गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटतेबाबत शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे. ही मदत वाढवून मिळावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा यांनी केली आहे.