Breaking News

दिवसा विजेचा पुरवठा करण्याची मागणी


पिंपळनेर/प्रतिनिधी
 निघोज परीसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. वडनेर बु परीसरात बिबट्याच्या हल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. वनविभागाकडे मागणी करून ही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परीसरात प्रचंड दहशत पसरली आहे. त्यामुळे या परीसरात विजेचा पुरवठा दिवसा करण्यात यावा अशी मागणी शिवबा संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
 बिबट्याचा वावर असताना या परीसरात विजेचा पुरवठा रात्री करण्यात येत आहे. हे अन्यायकारक आहे. त्यामुळे या भार नियमात तातडीने बदल करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
 निघोज व परीसरातील शिरसुले, वडनेर, वाजेवाडी, देविभोयरे व अनेक परीसरात शेतकर्‍यांनी बिबट्या पाहिला आहे. त्यामुळे संध्याकाळी 7 वाजता घराचे दरवाजे बंद होतात. अशातच विज वितरणाने विद्युत पंपाची लाईट रात्री करून समस्यात वाढ केली. या संदर्भात निघोज ओफिसला गेल्यानंतर अधिकारी नाही मग दाद मागायची कोणाकडे ? या ठिकाणी सक्षम अधिकारी कायमस्वरूपी असायला हवा, परंतु अनेक दिवसापासून ही खुर्ची खालीच आहे. विजेचा टाईम दिवसा होण्यासाठी तहसीलदार, वनविभाग, ग्रामपंचायतचे पत्र लागते. असे सांगण्यात आले. त्यानुसार शिवबा संघटनेच्यावतीने तहसील कार्यालय व वनविभागाच्या  कार्यालयाला तातडीने पत्र विज मंडाळाला देण्यासाठी विनंती चे पत्र देण्यात आले. तसेच विजयराव औटी, उपाभियंता पारनेर, कार्यकारी अभियंता अहमदनगर यानाही पत्र देण्यात आले आहे. सबंधिताना देण्यात आलेल्या निवेदनावर शिवबा संघटना प्रमुख अनिल शेटे, शंकर पाटील वरखडे, गणेश लंके, राजु लाळगे, खंडू लामखडे, नवनाथ बरशिले, स्वप्नील लामखडे, विशाल खैरे, निलेश वरखडे, निलेश लामखडे, विश्‍वास शेटे, राहुल शेटे, अंकुश वरखडे, लहु गागरे, नवनाथ लामखडे, दिलीप कवाद आदींच्या सह्या आहेत.