Breaking News

ढवळगाव - बेलवंडी फाटा रस्ता गेला खड्ड्यांत

कोळगाव/प्रतिनिधी
 श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव (वाळुंजमळा) ते बेलवंडी फाटा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ३  कोटी 80 लाख रूपये खर्चून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु हे डांबरीकरण होऊन चार महिने उलटले  नाहीत तोच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा खर्च खड्यात गेला असे म्हणावे लागेल.

 रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होऊंन अपघात वाढले आहेत. बऱ्याच ठिकाणी दीड मीटर रुंदीच्या साईड पट्ट्या केलेल्या नाहीत. हा रस्ता पुढे बेलवंडी रेल्वे स्टेशन व अष्टविनायकापैकी सिद्धटेक कडे जात असल्याने सातत्याने रस्त्यावर वाहतूक असते. परिसरात दोन सहकारी तर एक खासगी साखर कारखाना आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ चालू असते. कारखाने चालू झाले की रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढते. छोटे मोठे खड्डे पडतात. ठिकठिकाणी रस्ता खचल्याने अपघात होतात. त्यामुळे याकडे लक्ष पुरवून कार्यवाही करावी अन्यथा अनोदालन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

आमदारांनी या रस्त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देेेऊनही ठेकेदारांनी कामाचा दर्जा राखला नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी.

- अतुल लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते