Breaking News

कदम यांची आरटीओ पदी निवड

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी
येथील संकेत भगंवत कदम या तरुणाची आर.टी.ओ. पदी निवड झाली. देवळाली प्रवरात आर.टी.ओ. झालेला हा पहिलाच विद्यार्थी आहे. कदम यांचे शिक्षण पुण्यात झाले. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे  माजी नगराध्यक्ष अंबादास पाटील कदम व भिमराज पाटील कदम यांचा तो नातू आहे. त्याचे राधाकृष्ण विखे पाटील, माजी आ.चंद्रशेखर कदम, नगराध्यक्ष सत्यजित कदम, सामाजिक संघटना आदींनी अभिनंदन केले.