Breaking News

शिवसैनिकांकडून शिवसेनेच्याच कार्यालयाची तोडफोड

बदलापूर
बदलापूरातील शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे व नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभे आधी वामन म्हात्रे आणि नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्यात वादावादी झाली. त्या वादावादीचे पडसाद सभा संपल्यानंतर उमटले. काही शिवसैनिकांनी वडनेरे यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली

  या प्रकरणानंतर नगरसेवक आणि शहर प्रमुख यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून म्हात्रे आणि वडनेरे यांच्यात राजकीय वादंग निर्माण झाला होता. त्यातच वडनेरे हे गेल्या सहा महिन्यापासून विधानसभा निवणुकीच्या दृष्टीने प्रचाराला लागले होते. आणि त्यातूनच वाद विकोपाला चालला आहे.