Breaking News

गुरुदेव शाळेतील मुलांनी बनविले इकोफ्रेंडली गणपती

पारनेर/प्रतिनिधी
 पारनेर तालुक्यातील सुपा येथील गुरुदेव सेमी इंग्लिश स्कूल या शाळेतील मुलांनी शाळेतच शाडू मातीपासून इकोफ्रेंडली गणपती बनवले आहेत. संस्थेने कलाशिक्षक कानिफनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शाडू मातीपासून गणपती बनवणे ही कार्यशाळा आयोजित केली होती.
 शाडू माती कोरण्या वापरून मुलांनी सुबक अशा गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. हे सर्व गणपती मुलांना घरी बसवण्यासाठी देण्यात येणार आहेत. व एक मोठी गणेश मूर्ती शाळेत बसवण्यात येणार आहे. पर्यावरण स्नेही गणेशामुळे पाणी प्रदुषण, निसर्गाची होणारी हानी थांबविता येणार असल्याचे संस्थेच्या संचालक मंगल दोरगे यांनी मुलांना पटवून दिले. शाळेमध्ये गणेशाची स्थापना करून 10 दिवस विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. स्वत:हा बनवलेला गणपती बाप्पा घरी बसवण्याचा आनंद मुलांना या उपक्रमामुळे मिळाला.
 आर्यन गायकवाड, ओम येणारे, शिवराज जवक, साहिल दिवटे, सार्थक चौधरी, पुष्पक मगर, स्वराज मगर, यशराज मगर, ओम पवार, मेहराज पटेल, आयुष परांडे, ज्ञानेश्‍वर जवक, अनुष्का जंबे, विरेन साळुंके, अर्णव शिंगोटे, विराज मगर, गौरव गवळी, श्रेया देशपांडे, श्रावणी चेरुडकर, मयुरराज साबळे आदी मुलांनी सुंदर गणेश मूर्ती तयार केल्या. यावेळी वाघुंड्याचे सरपंच संदीप मगर, मंगेश गवळी, रोहिदास दिवटे उपस्थित होते.