Breaking News

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे हमालांना रेनकोट भेट

अहमदनगर/प्रतिनिधी
“समाजातील वंचित घटकांची जाणीव ठेवून  मदतीचा हात दिला पाहिजे. हमाल ऊन, वारा, पावसात धान्याचे पोते उचलण्याचे काम करतात. पावसाळ्यात त्यांना रेणकोटचा फायदा होणार असून, सामाजिक जाणीव ठेवून राष्ट्रवादीच्या युवकांनी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे’’ असे प्रतिपादन माजी जि.प. सदस्य सचिन जगताप यांनी केले.
जगताप यांच्या हस्ते हमालांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, बाबा गाडळकर, लकी खूबचंदानी, राजू आव्हाड, रोहित दहिफळे, स्वप्नील भोर आदी उपस्थित होते.