Breaking News

निघोज नागरी पतसंस्थेला दिपस्तंभ पुरस्कार

पिंपळनेर/प्रतिनिधी
 निघोज येथील निघोज नागरी सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीने दिपस्तंभ 2019 हा नाशिक विभागातील 100 कोटीपेक्षा जास्त ठेवी असलेल्या पतसंस्थांमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आज रविवारी (दि.1) महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त सतीश सोनी यांच्या हस्ते देण्यात आला. नागपूर येथे राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीने आयोजित एका शानदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद, उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, संस्थेचे जेष्ट संचालक अ‍ॅड. बाळासाहेब लामखडे व मुख्यव्यवस्थापक दत्तात्रय लंके यांनी स्विकारला. या पतसंस्थेची यापुर्वीही पुरस्कारासाठी निवड झाली होती. हा पुरस्कार मिळाल्यानंतर नाशिक विभागात सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान या पतसंस्थेला मिळाला आहे. ग्रामीण भागातील सभासद, खातेदार व ग्राहकांना माहीती व तंत्रज्ञानाच्या युगात दर्जेदार सेवा देत असताना सभासदांचा विश्‍वास संपादन करण्यास संचालक मंडळाने प्राधान्य दिल्याने आजच्या स्पर्धेच्या युगातही पतसंस्थेची प्रगती दिवसेदिवस झपाट्याने वाढत आहे. ही आभिमानाची गोष्ट असून सभासद, खातेदार व ग्राहकांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध राहु असा विश्‍वास संस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद यांनी पुरस्कार स्विकारताना सांगितले.