Breaking News

मेथडिस्ट चर्च चे अध्यात्मिक सामाजिक, व खेळाचे उपक्रम

अंबरनाथ / प्रतिनिधी
  येथील मेथडिस्ट चर्च मध्ये नुकतेच उल्हानगर येथून बदली होऊन आलेले रेव्हरंड फिलिप आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली चर्च मध्ये अध्यात्मिक, सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले, नुकतेच रात्री 10 वाजे पासून पहाटे 5 वाजे पर्यंत चर्चच्या महिला मंडळ तर्फे रात्र प्रार्थनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी संध्याराणी आल्हाट, रमा लॉरेन्स, ललिता आंची, रीडआंटी, ट्रेझा मिस्त्री, रूथ पाडाळे, मोनिका त्रिभोवन, फिलोमीना हिवाळे, निशा शिरसाट, शशी हिवाळे, क्रिस्टिना बेंजामिन, नलिनी, रिबेका त्रिभोवन, एस. चांदेकर व अन्य महिलांनी देशामधील पूर परिस्थिती, शेतकरीचे प्रश्‍न, सीमेवरील सैनिक, सांगली कोल्हापूर मधील पूरग्रस्त,370 कलम प्रकरणी शांतता, राजकीय नेते,  देशात शांतता नांदावी म्हणून आणी आध्यात्मिक संदेश देण्या करीता रात्रभर सर्वांनी प्रार्थना केल्या.
मेथडिस्ट मॅन आणी फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी चर्चचे रेव्ह, फिलिप आल्हाट यांच्या प्रार्थने नंतर आरोग्य शिबिरास प्रारंभ झाला. यावेळी रक्त तपासणी, शुगर लेवल तपासणी, इ.सी.जी, ब्लड प्रेशर आणी उंची, वजन समतोलपणाची मोफत तपासणी करण्यात आली. या वेळी सुमारे 110 लोकांनी शिबिराचा  लाभ घेतला. सदर शिबिराचे मुख्य समन्वयक मिसेस सलोमी मोटे या होत्या. तर हॉस्पिटलचे डॉ. कैलास यादव, सिस्टर सोनिया डेव्हिस, सिस्टर लव्हिना आणी सुश्रुत भालेराव यांनी लाभार्थींची तपासणी करून त्यांना योग्य ते औषधे देण्यात आली.
सोमवारी मेथोडिस्ट मेन, आणि  मेथोडिस्ट मराठी चर्च, अंबरनाथ तर्फे कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेचे (एकेरी) आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये 22 कॅरमचे आणि 13 बुद्धीबळ खेळाचे असे  एकूण 35 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे आयोजक मेथोडिस्ट मॅन चे अध्यक्ष रोहन गजभीव, प्रभारी रेव्ह फिलिप आल्हाट, आणी मेथोडिस्ट मॅनचे सहसचिव प्रतिश लॉरेन्स,व अन्य सहकारी उपस्थित होते.
कॅरम स्पर्धेत प्रथम विजेता ब्रधर येशु, (कन्नड चर्च) द्वितीय विजेता  जमेष, (मराठी चर्च) आणी  बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम विजेता शतरक (कन्नड चर्च) द्वितीय विजेता लुईस अश्‍नल (तेलगू चर्च) ठरले,  विजेत्या स्पर्धकांना रेव्ह. फिलिप्स आल्हाट यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या दोन्ही दिवशी चर्च मधील अनेक महिला व पुरुष मंडळीं मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.