Breaking News

मढीत तीन दुकानाना आग

पाथर्डी/प्रतिनिधी 
 मढी येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चैतन्य कानिफनाथ मंदिरासमोरील फुल, हार, नारळ, पुजेचे साहित्यांची विक्री करणार्‍या तीन दुकानाला आग लागली. 
  या आगीत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांची संजीवन समाधी आहे. येथे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांसाठी येथे पूजेचे साहित्य
इतर वस्तू विक्रीसाठी अनेक दुकाने थाटलेली आहेत. मंगळवारी मध्यरात्री आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. आग आटोक्यात
आणण्यासाठी पाथर्डी नगरपालिका, वृद्धेशर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. परंतु आगीचे रौद्र रूप असल्याने दुकाने तोपर्यंत खाक झाली होती. परंतु शेजारील 20 ते 25 दुकाने वाचविण्यात यश आले. आगीच्या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. आगीचे कारण मात्र, समजू शकले नाही.