Breaking News

सावेडी गावाच्या सहकार्यामुळेच मी महापौर

अहमदनगर/प्रतिनिधी
“सावेडी गावात विविध सामाजिक उपक्रम राबवून राजकारणात प्रवेश केल्यावर सावेडी गावाने केलेल्या सहकार्यामुळे नगरसेवक झालो. नंतर सभागृह नेता, विरोधीपक्ष नेता, स्थायी समिती सभापती अशा महत्वाच्या पदांवर काम केल्यानंतर आता पुन्हा सावेडी गावातूनच पुन्हा निवडून आल्याने महापौर होऊ शकलो. सावेडी गावातील प्रभागांमधील  विकास कामांकरीता आधी 3 कोटी व आता नव्याने 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सावेडी गावाचा चेहरा-मोहरा बदलण्याची कामे या निधीतून होणार आहेत’’, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रयत्नातून सावेडी गावातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या दुमजली सभा मंडपाचे भुमिपूजन चंद्रकांत बारस्कर महाराज व अजय बारस्कर महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर वाकळे बोलत होते.
कार्यक्रमास नगरसेवक रवींद्र बारस्कर, कुमार वाकळे, संपत बारस्कर, मनोज दुलम, आशा कराळे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष किशोर वाकळे, विलास ताठे, सतीश शिंदे, गजानन वाकळे, देविदास बारस्कर, राजेंद्र बारस्कर, अर्जुन बारस्कर, सुरेश बारस्कर, अशोक वाकळे आदी उपस्थित होते. विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात चालू असलेल्या सप्ताहाच्या सांगतानिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनात महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली.
नगरसेवक कुमार वाकळे म्हणाले, “महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रयत्नातून सावेडी उपनगर भागाकरिता भरपूर निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे माझ्या प्रभागातील कामेही मार्गी लागली आहेत. विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या होणार्‍या भव्य सभामंडपामुळे अनेक धार्मिक कार्यक्रम होणार आहे.’’
प्रास्तविकात नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मंजूर केलेल्या 13 कोटी रुपयांच्या निधीमधून होणार्‍या विकास कामांबद्दलची माहिती दिली.
यावेळी बाबासाहेब वाकळे, उदय कराळे, कचरु बारस्कर, विठ्ठल बारस्कर, गुलाब वाकळे, पुष्पकर कुलकर्णी, भारत बारस्कर, तुकाराम बारस्कर, विलास वाकळे, महादेव वाकळे, अशोक जाधव, दत्तात्रय बारस्कर, भानुदास बारस्कर, राजेंद्र वाकळे, महेश कराळे, विष्णू काळे, बिभीषण आडोळे, अंबादास चौधरी, चंद्रकांत सावंत, संतोष दंडवते, जरांगे महाराज, बन्सी वाकळे आदींसह नागरिक उपस्थित होते.