Breaking News

आ.मोनिका राजळे : विविध विकासकामांचे भूमिपूजन

शेवगाव/प्रतिनिधी 
  माझ्याकडून कोणत्या गावासाठी निधी कमी पडला असेल किंवा नजर चुकीने कमी जादा दिला गेला असेल, तरी त्याची भर पुढील पंच वार्षिकमध्ये नक्कीच भरून काढेल, या पुढील काळातही अनेक मोठ-मोठी विकासकामे आपण करणार आहोत. अशी ग्वाही आ. मोनिका राजळे यांनी आज शेवगाव-पाथर्डीमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना दिली.
 भर पावसात शेवगाव-पाथर्डीच्या आ.मोनिका राजळे यांच्या विकास कामांचा धडाका आज शेवगाव तालुक्यामध्ये पहावयास मिळाला. पाऊस चालू असतानाही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तालुक्यातील उत्तरेच्या भागातील गावांच्या विकास कामांचा तडाखा चालू होता. दिवसभर तळणी पासून विजय पवार पर्यंतचा उत्तरेचा भाग आमदारांनी पिंजून काढला. यावेळी ठिक-ठिकाणी आ. मोनिका राजळे यांचे कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
 मौजे तळणी ता. शेवगाव येथे गेवराई रोड ते सर्जे वस्ती या कामाचे भूमिपूजन शेवगाव-पाथर्डीच्या आ. मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आ. मोनिका राजळे, ह.भ.प.हरी महाराज घाडगे, भाजप तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, बंडू रासणे, रामहरी घुले, बाबासाहेब घुले, संतोष कंगणकर, बाळासाहेब महाडिक, संतोष साहेबराव घनवट, भगवानराव कोळगे, ज्ञानदेव शहाणे, शरद गोर्डे तसेच ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 त्याच बरोबर मौजे घोटण येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत घोटन ते नलगे वस्ती रस्ता व पंचवीस पंधरा अंतर्गत टाकळकर  वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, या कामाचा प्रांरभ शेवगाव-पाथर्डी मतदार संघाच्या आ. मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ह.भ.प.महादेव महाराज घुगे, भाजप तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, सरचिटणीस भिमराज सागडे, बंडू रासने, विजय नजन, चेअरमन लक्ष्मण टाकळकर, सरपंच अरुण घाडगे, संभाजी काळे, उमेश धस, सोमनाथ लोखंडे, जगन्नाथ भागवत, बाळासाहेब महाडिक, कोरडे, पंकज भागवत, नवनाथ फासाटे, बाबासाहेब घुगे, माजी सरपंच संजय टाकळकर, गोकुळ घनवट, सर्जेराव ढाकणे, अनिल गोसावी, कुंडली घुगे, बाळासाहेब साळवे, अर्जुन भोसले, बाबासाहेब मिसाळ, भाऊसाहेब पवार, अनिल कटारिया, राजू शेख, रामकिसन ढाकणे तसेच गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 त्याच बरोबर मौजे ताजनापूर येथे सभामंडप बांधणे या कामाचे भूमिपूजन आ. मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.