Breaking News

बिल अँड मेलिंडा गेटस् फाऊंडेशनचा मोदी यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

नवीदिल्ली
सार्वजनिक स्वच्छतेच्या हेतूने देशात ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या योगदानासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा गौरव केला जाणार आहे. बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेटस् फाऊंडेशनकडून त्यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती सोमवारी पंतप्रधान कार्यालयाने दिली.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, की ऑक्टोबर महिन्यात अमेरिका दौर्‍यादरम्यान पंतप्रधानांचा बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेटस् फाऊंडेशनकडून गौरव केला जाणार आहे. यापूर्वी सहा मुस्लिम राष्ट्रांनी आणि रशियाने मोदी यांना गौरविले आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेटस् यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी पंतप्रधानांचे कौतुक केले होते. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देशात आठ  कोटींहून अधिक स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे देशात पाच लाख गावे हागणदारीमुक्त झाली आहेत.