Breaking News

सुप्यात कचरा वाहतुकीसाठी वाढीव घंटा गाड्या


पारनेर/प्रतिनिधी
 औद्योगिक वसाहतीमुळे सुपा शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता ग्रामपंचायतीच्यावतीने कचरा वाहतुकीसाठी घेण्यात आलेली घंटा गाडी कमी पडत होत्या. त्यामुळे (दि.25 जुलै) सुपा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांच्यावतीने घंटा गाडीच्या मागणी करण्यात आली होती. त्यानूसार सरपंच शेख यांच्या प्रयत्नाने घंटा गाडी मिळाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
 लोकसंख्या लक्षात घेता एक गाडी अपुरी पडते. त्यामुळे अजून दोन घंटा गाड्यांची आवशक्ता आहे. परीसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण होत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी सुपा ग्रामपंचायतमध्ये सरपंच हाजी राजुशेठ शेख यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सरपंच हाजी राजु शेख यांनी निवेदन स्विकारत एक महिन्याच्या आत पुर्ण करन्याचे आश्‍वासन दिले. (दि.30) त्यांनी आश्‍वासन पुर्ण केल्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्यावतीने सरपंच शेख यांचा सत्कार करण्यात आला.
 यावेळी पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दिपक पवार, उपसरपंच ज्योती पवार, दत्ता पवार, बाळासाहेब औचिते, लहानू पवार, उज्वला शिंदे, शोभा पवार, हेमलता पवार, भागवत जाधव, दिलीप पवार, सचिन काळे, बुचुडे, कोल्हे, भाऊ गवळी, संजय भुतारे, विठ्ठल पवार, जयवंत पवार, संभाजी ठोकळ, बबन ठोकळ, रमिज शेख, सचिन काळे, शिवराज शितोळे, राजु गवळी,गोविंदराव शितोळे, राहुल पवार, संजय भुतारे, शिराज शेख, सचिन वाढवणे, बाबु पवार, गणेश सोनवणे उपस्थित होते.