Breaking News

जम्मू आणि कश्मीरचा मुद्दा सोडून पाकिस्तानशी चर्चा शक्य : डॉ सुब्रमण्यम जयशंकर

jaishankar
ब्रुसेल
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांनी पाकिस्तानला उद्देशून मोठे विधान केले आहे. जम्मू आणि कश्मीर च्या मुद्दा सोडून भारत पाकिस्तानशी कोणत्याही मुद्दयांवर चर्चा करायला तयार आहे अशी स्पष्टोक्ती जयशंकर यांच्याकडून देण्यात आली आहे. पुढे म्हणाले की, चर्चा करण्याआधी सीमेपलीकडील पाक पुरस्कृत आतंकवाद आणि हिंसा सुद्धा बंद व्हावी अशी अट जयशंकर यांनी घातली आहे. यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले होते की, भारतासोबत चर्चा करायला पाकिस्तान तयार आहे. जम्मू आणि काश्मिरातून कलम 370 रद्द केल्याबद्दल रशिया नंतर आता भारतास ऑस्ट्रलियाचे समर्थन प्राप्त झाले आहे. याबाबत भूमिका स्पष्ट करताना भारतात ऑस्ट्रलियाच्या उच्चयुक्त हरिंदर संधु म्हणाल्या की, कलम 370 रद्द करणे हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. ऑस्ट्रलिया भारत सरकारच्या या निर्णयाचा सन्मान करते भारत आणि पाकिस्तान मधील सर्व समस्या द्वीपसक्षीय मार्गाने तसेच परस्पर संवादाने सोडविल्या जाव्यात असे ऑस्ट्रलियाचे मत नेहमीच राहिले आहे.