Breaking News

सीताराम बाबा पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर फोटो

जामखेड/ता.प्रतिनिधी
तालुक्यातील खर्ड़ा येथील सिद्धसंत सीताराम बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ४६ व्यक्तींनी रक्तदान केले.

 यावेळी बोलताना आयोजनकर्ते पवार म्हणाले की आजपर्यंत विविध महापुरुषांची जयंती व नेत्यांच्या  जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिरे घेतली जातात. या सहा माध्यमातून हे रक्तसंकलन बार्शी येथील राम भाई शाह रक्तपेढीत आजपर्यंत ४ हजार 500 बाटल्या रक्त दिले आहे. यातुन या भागातील गरीब व गरजू लोकांना या रक्त बाटली अगदी अल्प दरात दिली जाते. त्यामुळे मोठा आर्थिक फायदा होतो व रक्त तात्काळ भेटते.

  या कार्यक्रमाचे उदघाटन इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. रोहित पवार यांनी भेट देऊन माहिती घेतली व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महालिंग कोरे, गणेश तागड, राजू लोंढे, भिकन तांबोळी, सचिन रोकडे आदींनी प्रयत्न केले.