Breaking News

पी. गुणेश्‍वरन उपांत्यपूर्व फेरीत

जिनेन
चीनमध्ये सुरू असलेल्या एटीपी टूरवरील जिनेन खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या टॉप सीडेड प्रज्नेश गुणेश्‍वरनने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना चीन तैपेईच्या वू चा पराभव केला. 162,480 डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या हार्ड कोर्टवरील सुरू असलेल्या या स्पर्धेत डावखुऱया गुणेश्‍वरनने वू चा 6-4, 7-6 (7-3) असा पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले. प्रज्नेशने हा सामना दीड तासांच्या कालावधीत जिंकला. दुसऱया एका सामन्यात जपानच्या आठव्या मानांकित सोएदाने चीनच्या दी वू याचा 6-1, 6-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. प्रजनीश आणि सोएदा यांच्यात पुढील फेरीचा सामना होईल. पुरूष दुहेरीत भारताच्या डी.शरण आणि एब्डन या जोडीने खिस्टेन आणि सँटीलेन यांचा 6-1, 6-4, भारताच्या साकेत मायनेनी आणि एन. जीवन या जोडीने दुहेरीची उपांत्यपूर्व गाठताना मॉरिया आणि ऑलीव्हेरा यांचा 7-5, 6-2 असा पराभव केला.