Breaking News

नगर अर्बन बँकेवरील संकट दूर व्हावे : प्रशासक मिश्रा

अहमदनगर/प्रतिनिधी
 नगर अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयात प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्या हस्ते विधीवत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी अर्बन बँकेवरील सर्व संकटे दूर होवून बँकेचा कारभार सुरळीत व्हावा, यासाठी मिश्रा यांनी श्री गणेशाच्या चरणी संकल्प केला. बँकेचे प्रमुख व्यवस्थापक सतीश शिंगटे, प्रमुख व्यवस्थापक सतीश रोकडे आदींसह बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा म्हणाले, “नगर अर्बन बँकेची गणेशोत्सव साजरा करण्याची शतकोत्तर ऐतिहासिक परंपरा पाहून समाधान व आनंद वाटत आहे. बँकेचा प्रशासक म्हणून सूत्र हाती घेण्यास एक महिना  झाला असून या कालावधीत बँकेच्या ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुमारे 30 करोडहून जास्त नव्या ठेवी जमा झाल्या आहेत. तसेच एनपीए कमी करण्यासाठी वसुली मोहिमेवर भर देत असून, दररोज 1 ते 2 करोड रुपयांचे थकीत कर्ज वसूल केले जात आहे. यासाठी बँकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य होत आहे. बँक पूर्वीप्रमाणेच सुस्थितीत असून, बँकेचा कारभार व्यवस्थित चालू आहे, अशी माहिती दिली.