Breaking News

आरोप सिद्ध करा; अन्यथा विष्ठा खा

कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे राजू शेट्टींना आव्हान

कोल्हापूर / प्रतिनिधी
आईची शपथ घेऊन सांगतो ‘कडकनाथ’ कोंबड्यांच्या घोटाळ्याप्रकरणी माझा संबंध नाही. माझ्यावर टीका करणार्‍यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा भरचौकात विष्टा खावी, असे आव्हान कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिले.

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकर्‍यांची जवळपास 500 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कडकनाथ संबंधीची कंपनी खोत यांच्या नातेवाइकांची असल्याचा आरोप होत आहे. यावरुन  खोत आणि शेट्टी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आपल्यावरील आरोपाला प्रत्युत्तर देताना खोत म्हणाले, की मी मंत्री झाल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सातत्याने माझ्यावर चुकीचे आरोप होत आहे. कडकनाथ संबंधीच्या रयत अ‍ॅग्रो कंपनीशी माझा काहीही संबंध नाही. महा रयत अ‍ॅग्रो आणि रयत क्रांती संघटना दोन शब्द समान असल्याने विरोधक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यावर झालेले आरोप सिद्ध झाले तर मी राजकारणातून संन्यास घेईन.
कडकनाथ प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोंबडी चोर म्हणणार्‍यांना कोंबडीची तंगडी आवडते अशीही टीका खोत यांनी शेट्टी यांच्यावर केली.