Breaking News

युतीने जिल्ह्यात मुस्लिमांनाही उमेदवारी द्यावी:शेख

कोळगाव/प्रतिनिधी
भाजप-शिवसेना युतीने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यात मुस्लिम समाजाला एका जागेवर उमेदवारी द्यावी अशी मागणी अल्पसंख्यांक विकास परिषदेचे नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शकिलभाई शेख यांनी केली आहे. या मागणीसाठी समाजाचे शिष्टमंडळ गृहनिर्माण मंत्री   राधाकृष्ण विखे, खा डॉ.सुजय विखे, खा.सदाशिव लोखंडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, विधानसभा उपसभापती आ.विजय औटी यांची भेट घेणार आहे.

   पाच महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप सेना युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या विजयासाठी दक्षिण व उत्तर या दोन्ही मतदार संघातील मुस्लिम समाजाच्या नेते मंडळींनी   प्रचार केला. तसेच उत्तरेतील शिर्डी मतदार संघातही शिवसेना उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी प्रचारात भाग घेतला. जिल्ह्यात १९८० च्या दशकात नगर मतदार संघात स्व. प्रा.एस.एम.आय.आसिर वगळता राजकीय पक्षांनी मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली नाही. जिल्ह्यातील मुस्लिम बहुल भागात भाजप सेनेने एक जागा दिल्यास उमेदवार निश्चितच विजयी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.