Breaking News

गावकर्‍यांनी पाण्यासाठी चळवळ उभी करावी : झावरे

 पारनेर/प्रतिनिधी
 गावकर्‍यांनी एकत्र येत पाण्यासाठी चळवळ उभी केली. भविष्यात एकमेकाची जिरवण्यापेक्षा पाणी अडवण्याचे काम केले पाहिजे, वडनेर-हवेली येथील तरुणांनी हाती घेतलेले हे काम कोणत्याही गावाला लाजवील अशा प्रकारचा झाले आहे. पाण्याच्या चळवळीमध्ये संपूर्ण गाव राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आल्याने हे काम उभे राहू शकले. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले.
 पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथे विविध विकास कामांचे उद्घाटन जि.प.मा.उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
 यावेळी पुढे बोलताना झावरे म्हणाले की, रस्ते सभामंडप काँक्रिटीकरण ही कामे उभे राहतील. परंतु तालुक्याची दुष्काळी असणारी ओळख व ज्याच्यावर बळीराजा अवलंबून आहे. त्या पाण्याचे काम वडनेर हवेली या गावाने केले. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सर्व गावकर्‍याचे झावरे यांनी कौतुक केले. संस्कृत वाटेने तुम्ही चालले पाहिजे, अन्यथा उद्याच्या काळामध्ये टोळीयुद्ध सोडून प्रत्येक गावांमध्ये काहीच दिसणार नाही. कोण कोणत्या कामगाराच्या पगारातून स्वतःचे खिसे भरतो कामगार बारा तास ड्युटी करतात. व त्यांना आठ तासाचा पगार मिळतो. उरलेल्या तासाचा पगार जातो कुठे ? हे सर्व रोखायचे असेल तर वेळीच सावध झाले पाहिजे, राज्याला विचार पुरवणारा सुसंस्कृत तालुका म्हणून राज्यात तालुक्याची ओळख आहे. ती ओळख तशीच राहावी, असे सुजित झावरे म्हणाले. यावेळी सुजित झावरे जि.प.प्राथ.शाळेला लेझीम सेट, तसेच तीन फॅन देण्यात भेट देण्यात आले. 
 यावेळी पं.स.चे माजी सभापती गंगाराम बेलकर, माजी सभापती अरुणराव ठाणगे, बाबासाहेब खिलारी, दादासाहेब पठारे, विजय पठारे, अमोल साळवे, दिपक नाईक, योगेश मते, सतीश पिंपरकर, बाळासाहेब दिघे, अनिलराव वाबळे, किशोर वाबळे, प्रकाश पवार, डॉ.सुनिल काळे, सतीश तरटे, भरत गट, सरपंच लहुशेठ भालेकर, उपसरपंच नंदुशेठ भालेकर, रानुजी बढे, ह.भ.प.सोनुळे महाराज, कुटे गुरुजी, गुलाबराव बढे, देवराम बढे, विलास भालेकर, सुभाष शिंदे उपस्थित होते.