Breaking News

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

शहरातील सखल भागात पुन्हा शिरले पाणी

सांगली
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ कायम असून पाणीपातळी सध्या 33 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे शहरातल्या सखल भागात पाणी शिरू लागले आहे. त्यामुळे जवळपास 30 हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. तर पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन एनडीआरएफ पथकांना पाचारण केले आहे.कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. रविवारपासून ही वाढ पुन्हा होऊन पाणी पातळी 33 फुटांवर पोहोचली आहे. कोयना धरणातून सध्याच्या घडीला 53 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्या ठिकाणी सध्या पावसाचा जोर मंदावला आहे, असे जरी असले तरी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी अधिक प्रमाणात सुरुच आहे.कृष्णेच्या पाणी पातळीत वाढहेही वाचा - भामरागड चौथ्या दिवशीही पाण्याखालीच; गोसीखुर्दचे पाणी सोडल्याने पुन्हा पुराचा धोकाचार दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने 34 फुटांपर्यंत पाण्याची पातळी पोहोचेल, असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहावे अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. तर, कृष्णेचे वाढलेले पाणी शहरातल्या सखल भागात शिरले आहे. सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, काकानगर, इनामदार प्लॉट या परिसरातही पाणी शिरत आहे, सध्या आठ ते दहा घरांमध्ये पाणी शिरले आहे