Breaking News

वृक्ष लागवडीने जन्मदिन साजरा

 जामखेड/ता.प्रतिनिधी

 जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव येथील मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिंदे यांचा वाढदिवस वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला. तसेच यानिमित्ताने जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सात लाख रुपयांची तालीम २५/१५ मधून मंजूर करून त्याचे उदघाटन केले.

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, माझे धोंडपारगाव या गावावर प्रेम आहे. त्यामुळेच या वाढदिवसाचे औचित्य साधत तालीम दिली. या वेळी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे, मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष बिभीषण खोसे, जिल्हा सचिव रावसाहेब मरकड, सकल मराठा समाजचे समन्वय मंगेश अजबे, जि. प. सदस्य पाचारणे आदींसह मित्र परिवार उपस्थित होता.