Breaking News

विदर्भाचा शिव ठाकरे ठरला बिग बॉस मराठीच्या दुसर्‍या पर्वाचा विजेता

मुंबई
बिग बॉस मराठीच्या दुसर्‍या पर्वाच्या विजेतेपदावर अमरावतीच्या शिव ठाकरे याने आपले नाव कोरले आहे . याअगोदर शिव ‘एमटीव्ही रोडीज’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता .अमरावतीसारख्या जिल्ह्यातून आलेल्या शिवने ‘रोडीज’मध्येही आपले नाव उंचावले आहे . त्यामुळे ‘रोडीज’ मुळेही त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली.’बिग बॉस मराठी 2’मध्ये त्याची आणि शोमधील दुसरी स्पर्धक वीणा जगतापची चांगली मैत्री जमली. या दोघांचं अफेअर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. शिव बिग बॉस जिंकताच त्याच्यावर सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान अभिनेत्री नेहा शितोळे या स्पर्धेची उपविजेती ठरलीय आहे. नेहा शितोळे आणि शिव ठाकरे हे दोघेही अंतिम फेरीत पोहोचले आणि विजेता म्हणून शिव ठाकरेचं नाव घोषित करण्यात आलं. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसर्‍या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर पोहोचले.