Breaking News

शिवकुमार यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई : मल्लिकार्जुन खरगे

Mallikarjun Kharage
बंगळूरु 
काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री डी के शिवकुमार यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. प्रतिशोध घेण्यासाठी तसेच शिवकुमार यांना राजकीयदृष्टया कमजोर करण्यासाठी केंद्र सरकार यंत्रणांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खरगे लावला आहे. खरगे पुढे म्हणाले की, सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून केंद्र सरकार काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचे मानसिक खच्चीकरण करू पाहत असून. नियमाप्रमाणे शिवकुमार यांनी सरकारी यंत्रणांना सहकार्य केले. ते पळून तर गेले नाहीत मग डी के शिवकुमार यांचा मानसिक छळ का केला जातो आहे असा सवाल खरगे यांनी केला. डी के शिवकुमार यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या विविध प्रकरणात सक्तवसुली संचालनाल्याने काल अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून ते चौकशीस सामोरे जात होते. डी के शिवकुमार कर्नाटक काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री असून काँग्रेस-जेडीएसच्या आघाडी सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाट होता. 2018 निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितून बाहेर काढण्यासाठी डी के शिवकुमार यांनी आघाडी घेतली होती. कर्नाटकच्या बाहेर सुद्धा शिवकुमार संकट मोचक म्हणून अनेक वेळा सामोरे आहे. काँग्रेस- जेडीसच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीला सावरण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते.