Breaking News

शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करणार : झावरे

पारनेर/प्रतिनिधी
 पारनेर पंचायत समितीच्यावतीने शिक्षक व केंद्रप्रमुख यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक योगदानाबद्दल गुणवंत पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी घोषणा पारनेर पंचायत समितीचे सभापती राहूल झावरे यांनी केली आहे.
 प्रत्येक केंद्रातून एक शिक्षक या प्रमाणे तालुक्यातून 23 शिक्षक व तालुक्यातून 2 केंद्र प्रमुखांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. पारनेर पंचायत समितीच्यावतीने पुढील आठवड्यात कार्यक्रम आयोजित करून या पुरस्कारार्थ्यींना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी शिक्षकांची नावे लवकरच जाहीर करु, असे सभापती राहूल झावरे यांनी सांगीतले.
 दरम्यान तालुका पुरस्कार समितीचे प्रमुख दिनेश बाबर यांनी चांगले काम करणार्‍या शिक्षकांचे कौतुक झाले पाहिजे, तसेच त्यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा, या उद्देशाने हे पुरस्कार पंचायत समितीच्यावतीने देत आहोत. अशी प्रतिक्रिया प्रतिनिधीशी बोलताना दिली. यावेळी पुरस्कार समितीचे सदस्य तथा पंचायत समिती सदस्य डॉ.श्रीकांत पठारे व पंचायत समिती सदस्या सुप्रिया साळवे हे हजर होते. तालुक्यातील सर्व अधिकारी यांनी योग्य निवड करून पंचायत समितीच्या सर्व सदस्यांच्या संमतीने पुरस्कारार्थीं निवडले जाणार असल्याची माहिती पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दिपक आबा पवार यांनी दिली.