Breaking News

आनंदऋषिजी हॉस्पिटलमधील शिबिरांत सहा हजार रुग्णांची तपासणी

अहमदनगर/प्रतिनिधी
“जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषिजी हॉस्पिटलमध्ये 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत सुरु असलेल्या गरजू, गरीब  रुग्णांच्या सेवेसाठी मोफत 18 शिबिरांचा समारोप शनिवारी करण्यात आला. आनंदऋषिजी यांच्या 119 व्या जन्मजयंतीनिमित्त हॉस्पिटलमध्ये झालेल्या या शिबिरांचा 6021 रुग्णांनी लाभ घेतला’’ अशी माहिती युवा उद्योजक, जैन सोशल फेडरेशनच्या वतीने संतोष बोथरा यांनी दिली.
समारोपाच्या कार्यक्रमात दंतरोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी श्रीरामपूर येथील उद्योजक घेवरचंद पन्नालाल कोठारी व परिवार तसेच प्रवरासंगमचे    उद्योजक अशोकलाल रमेशलाल ललवाणी परिवाराचे योगदान लाभले होते. शिबिराचे उद्घाटन रमेश ललवाणी व अमित कोठारी याच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी संगीता कोठारी, देवांश कोठारी, सुमीत ललवाणी, डॉ. प्रकाश कांकरिया, संतोष बोथरा, सतीश लोढा, मिलापचंद पटवा, उबेद शेख, संतोष गुगळे, सचिन कटारिया, सुभाष मुनोत, डॉ.आशीष भंडारी, प्रकाश छल्लाणी आदी उपास्थित होते.