Breaking News

हर्षवर्धन जाधव शिवसेनेत घरवापसी करण्यास इच्छूक

मुंबई 
 आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. बरेच नेते घरवापसी करतानादेखील पाहायला मिळत आहे. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव हेदेखील शिवसेनेत घरवापसी करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लोकसभा निवडणुकीत जाधव यांनी घेतलेल्या मतांमुळेच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाल्याची चर्चा आहे. जाधव यांना भाजपने साथ दिली असल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. मात्र आता कुणाची ऑफर आली तर विचार करू, असं जाधव यांनी म्हटले आहे.