Breaking News

वंचित बहुजन आघाडीचा आज पोलखोल मोर्चा

अंबरनाथ --
अंबरनाथ शहरातील जनते ला नागरी सुविधा मिळत नसल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहेत याला नगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष आणि आमदार व पालकमंत्री हे जबाबदार असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे, आगामी आज 9 सप्टेंबर रोजी याबाबत जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसीलदार कार्यालयावर ’पोलखोल मोर्चा’ काढण्यात येणार असल्याचे  वंचित बहुजन आघाडीचे नेते धनंजय सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शुक्रवारी येथील वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक नेते धनंजय सुर्वे, सुधाकर बर्वे, संजय बन्सल ,अविनाश गाडे ,सतीश कांबळे एम आय एमचे शहराध्यक्ष अक्रम खान यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली यावेळी धनंजय सुर्वे यांनी आरोप केला की अंबरनाथ शहरातील गोर - गरीब जनतेच्या उपचारासाठी छाया रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे  परंतु येथे प्राथमिक उपचार  होत नाहीत, ऑपरेशन थिएटर बंद आहेत , एक्सरे मशीन बंद आहेत, यामुळे उपचारासाठी लोकांना ठाण्याच्या शिवाजी रुग्णालय अथवा मुंबईच्या रुग्णालयात जावे लागत आहे, मोठा गाजावाजा करून व लाखो रुपये खर्च करून छाया रुग्णालयात शवविच्छेदन केंद्र बांधले आहे मात्र ते बंद अवस्थेत आहे. शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या आणि जलवाहिन्या बसवल्या आहेत  तरी  पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे . पोस्ट ऑफिस कार्यालय आणि शिधावाटप कार्यालय मोडकळीस आलेले आहे .
शहरातील गोरगरीब जनतेच्या लग्नसमारंभ, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शहराच्या पूर्व आणि पश्‍चिम भागात वेल्फेअर सेंटर सुरू केले होते . या इमारतीची आता पडझड झाली आहे,  काही राजकीय नेत्यांचे स्वतःचे मंगल कार्यालय असल्याने ते जाणुन - बुजुन त्याची दुरुस्ती होऊ नये म्हणुन नगरपालिकेवर दबाव टाकत आहेत,  नगरपालिकेला स्वतःच्या मालकीचे डम्पिंग ग्राउंडची जागा असून देखील अनधिकृत डम्पिंग ग्राउंड मध्ये कचरा टाकत आहे , यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे व  कचरा व्यवस्था कोलमडली आहे , कल्याण-कर्जत राज्यमहामार्गच्या कामात रस्त्याच्या जागेवर पेव्हर ब्लॉक बसविले आणि नंतर ते काढून पुन्हा काँक्रीटकरण केले जात आहे, या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे . तसेच रुंदीकरणाच्या कामात  शेकडो दुकानदारांना उध्वस्त केले गेले मात्र त्या जागेवर अद्याप देखील रस्त्याचे काम अपूर्ण आहेत . या राज्य महामार्ग मध्ये अंबरनाथ च्या हद्दीत आतापर्यंत 185 लोकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. असे अनेक ज्वलंत विषयाची पोल- खोल  मोर्चामध्ये करणार आहोत सदर माहिती वंचित आघाडी चे  धनंजय सुर्वे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दिली आहे.