Breaking News

प्रस्तावित कामे पुढील पाच वर्षात पूर्ण करू:आ.कोल्हे

कोपरगाव / ता.प्रतिनिधी
भाजप-सेना युती शासनाने आपल्याला लोकप्रतिनिधित्वाची संधी दिली. त्याचे पाच वर्षात सोने करण्याचा प्रयत्न केला. मतदार संघातील ७९ व शेजारच्या पुणतांबा परिसरातील १० अशा ८९ गावांत विकासाचा निधी पोहोचवला. याउलट ज्यांना संधी मिळाली ते फक्त टीका-टिप्पणी आणि आपल्या विरोधात वातावरण निर्मिती करत राहिले. उर्वरित प्रस्तावित कामे जनतेच्या साथीने आगामी पाच वर्षात पूर्ण करू असा विश्वास आ.स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केला

  लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील संवत्सर येथे शालेय विद्यार्थ्यांच्या  तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गावरील शृंगेश्वर चौफुली येथे सुमारे दोन लाख रूपये खर्च करून बसशेड उभारण्यात आले. त्याचे लोकार्पण व सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आ. कोल्हेंच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी सरपंच चंद्रशेखर देशमुख होते.

याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष शरद थोरात, भरत ढमढेरे, सहकारमहर्षि कोल्हे कारखान्यांचे संचालक ज्ञानेश्वर परजणे, शिवाजीराव बारहाते, बापूसाहेब बारहाते, रामभाऊ कासार, विजय काळे, मुकूंद काळे, राजेंद्र सखाहरी परजणे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते