Breaking News

सहकारी संस्थाना सावरणे हे चालकांचे कर्तव्य:गडाख

नेवासे/प्रतिनिधी

 ग्रामीण व शहरी भागाचे वैभव असलेल्या सहकारी संस्था अडचणीत आल्यानंतर तीचे हित जपणे हे संस्था चालकांचे कर्तव्य असते प्रतिपादन माजी आमदार शंकरराव गडाख यानी केले. नेवासे तालुक्यातील स्व. लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेच्या वतीने गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर वीजबिल भरणा केंद्राचे स्थलांतर व मिनी एटीएम केंद्राचे उदघाटन माजी आ. शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली तर शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

  यावेळी स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष व नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.पतसंस्थेच्या नवीन इमारतीत खातेदारांसाठी लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असून कोअर बँकींग,कॅश क्रेडीट कर्ज सुविधा चालू करण्यात आल्या आहेत. अशा सुविधा देत असताना वीजबिल भरणा  केंद्र व मिनी एटीएम केंद्र सुरू होत असल्याने त्याचा ग्राहकांना लाभ होणार असल्याचे सांगितले.

 यावेळी नेवासा खुर्द सोसायटीचे अध्यक्ष दिलीप जामदार, बाळासाहेब पाटील, भाऊसाहेब वाघ, गोरख घुले, स्व. लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, उपाध्यक्ष महंमदभाई शेख, संचालक डाॅ.भाऊसाहेब घुले, अॅड. बाळासाहेब शिंदे नरसु लष्करे,मोहन पारखे,विकास शेंडे,दिपक दुधे,दिलीप जाधव किशोर सोनवणे आदींसह  विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पतसंस्थेचे उपाध्यक्ष महंमद भाई टेलर यांनी उपस्थितांचे आभार मानले.