Breaking News

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात एकूण 20 उमेदवारांकडून 30 अर्ज दाखल

शेवगाव श/प्रतिनिधी
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात (222) निवडणुकीसाठी आज शुक्रवारी (दि.4) 8 उमेदवारांनी 12 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रतापराव ढाकणे व त्यांच्या पत्नी प्रभावती ढाकणे यांनी तर एमआयएम पक्षा तर्फे कमरूद्दिन शेख यांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज अखेर एकूण 20 उमेदवारांनी 30 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नामदेव पाटील व विनोद भामरे, नायब तहसीलदार मयूर बेरड हे शेवगाव - पाथर्डी (222) मतदार संघाच्या विधानसभा निवडणुकीचे काम पाहत आहेत. आज शुक्रवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार - प्रतापराव बबनराव ढाकणे (3 अर्ज)-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, प्रभावती प्रतापराव ढाकणे (2) -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कमरूद्दिन दगडू शेख (2) एमआयएम पक्ष, तसेच सुनिल मोहनराव पाखरे (1), सदाशिव सटवाजी शिंदे (1), सचिन नानासाहेब उगले (1), बाबासाहेब सुखदेव ढाकणे (1), किसन नामदेव आव्हाड (1) या सर्वांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दि.27 रोजी 1 उमेदवारी अर्ज दाखल होता. तर दि.3 ऑक्टोबर रोजी भाजपच्या उमेदवार आ. मोनिका राजळे, जि.प.सदस्या हर्षदा काकडे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किसन चव्हाण यांच्यासह 12 उमेदवारांनी 18 अर्ज दाखल केले होते. उद्या शनिवारी (दि.5) रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून सोमवारी (दि.7) रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून त्यानंतर शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.