Breaking News

’कौन बनेगा करोडपती’च्या नावाने तरुणाला 40 हजाराला गंडा

KBC Fraud
शाहजहांपूर 
कौन बनेगा करोडपतीची   सध्या युवकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या कार्यक्रमांत ग्लॅमर आणि पैसा असल्याने युवकांमध्ये त्याचं गारूड आहे. त्यातच बिग बी अमिताभ बच्चन यांचही आकर्षण असल्यानं कधी तरी त्या ’हॉट सीट’वर जायला मिळावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. तरुणांमध्ये असलेलं हेच आकर्षण लक्षात घेऊन काही भामटे फसवणूक करत असल्याचं पुढे आलंय. अशा फसवणूक करणार्‍यांची टोळी सक्रिय असून ते बनावट फोन करून बक्षिस लागल्याचा फोन करतात आणि टॅक्ससाठी पैसे भरायल सांगतात. असाच फोन करून उत्तर प्रदेशातल्या एका तरुणाला 40 हजारांनी गंडा घातल्याचं उघड झालंय. सायबर क्राइमचा (Cyber Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरविंद मौर्य असं फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव आहे. अरविंद हा विद्यार्थी आहे. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार एक दिवस त्याला फोन आला आणि फोन करणार्‍याने त्याला सांगितलं की तो  ’कौन बनेगा करोड़पति’ गेम शो (KBC Game Show )मधून बोलतोय. तुम्हाला फोनवर काही प्रश्‍न विचारले जातील. त्याची उत्तरं मिळाली तर तुम्हाला 25 लाखांचं बक्षीस मिळेल. अरविंद त्यासाठी तयार झाला. नंतर त्याला काही प्रश्‍न विचारण्यात आले आणि थोड्या वेळाने त्याला फोन करून सांगण्यात आलंय की तो जिंकला असून त्याला 25 लाखांचं बक्षीस लागलं आहे.

कोन बनेगा करोडपतीचं 25 लाखांचं बक्षिस लागल्याचं सांगितल्यानंतर अरविंदही आनंदीत झाला. नंतर त्या फोन करणार्‍या भामट्याने बक्षिसावरचा टॅक्स म्हणून त्याला 40 हजार रुपये भरण्यास सांगितले. अरविंदने कुठलाही विचार न करता दिलेल्या अकाऊंटवर पूर्ण पैसे भरले. नंतर त्याला आणखी पैशांची मागणी केली गेली तेव्हा त्याला आपल्याला फसवल्या गेल्याचं लक्षात आलं आणि त्याने पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी गुन्हा दाखल करत सायबर क्राइमकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. असे फोन आले तर त्याला प्रतिसाद न देता त्याची तक्रार करा असं आवाहन पोलिसांनी केलंय