Breaking News

मोदी सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करणार 60 हजार कोटी

नवी दिल्ली 
मोदी सरकारकडून शेतकर्‍यांसाठी एक खूशखबर आहे. लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात सरकारकडून रोखरक्कम जमा केली जाणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत आतापर्यंत देशातील 7.45 कोटी शेतकर्‍यांना निधी देण्यात आला आहे. पण यापैकी केवळ 2.99 कोटी लोकांनाच या योजनेचा तिसरा हप्ता मिळला. देशातील 11.5 कोटी शेतकर्‍यांना अद्याप अंतिम टप्प्यातील निधी मिळालेला नाही. उर्वरित शेतकर्‍यांना नोव्हेंबर महिन्याच्या अखेरिसपर्यंत निधी पोहोचण्याचा प्रयत्न केंद्रीय कृषि मंत्रालय केला जात आहे. केंद्रीय कृषि राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यानुसार,’आतापर्यंत पहिला, दुसरा आणि तिसर्‍या हप्त्याच्या स्वरुपात 27 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे’. पुढील काही महिन्यांमध्ये शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 60 हजार कोटी रुपयांचा निधी जमा होणार असल्याची माहिती आहे.

शेतकर्‍यांसाठी दिलासा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत 14.5 कोटी शेतकर्‍यांना तिसर्‍या टप्प्यातील रक्कम पोहोचवण्यासाठी 87 हजार कोटी रुपये एवढा खर्च होणार आहे. पण काही शेतकर्‍यांचं बँक खातं आधार कार्डसोबत लिंक न करण्यात आल्यानं रक्कम जमा होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. ही अडचण पाहता सरकारनं 30 नोव्हेंबरपर्यंत बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवून दिली आहे. ही प्रक्रिया होईपर्यंत बहुतांश शेतकर्‍यांच्या बँक खात्यात रोखरक्कम जमादेखील होईल.

14.5 कोटी शेतकर्‍यांना मिळणार दिलासा

मोदी सरकारनं आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत देशातील सर्व 14.5 कोटी शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव मंजुर केला होता. सुरुवातीला छोट्या शेतकर्‍यांना या योजने अंतर्गत आणण्यात आलं, म्हणजे ज्या शेतकर्‍यांकडे पाच हेक्टेर जमीन होती, त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. यासाठी निधीचा बजेट 75 हजार कोटींहून वाढवून 87 हजार कोटी रुपये करण्यात आला होता.

रक्कम खात्यात आली नाही, तर काय?

जर तुमच्या बँक खात्यात किसान सन्मान निधीची रक्कम पोहोचली नाही तर सर्वात आधी आपल्या महसूल अधिकारी (लेखपाल) आणि नियोजन विभागाच्या अधिकार्‍यांसोबत संपर्क साधा. तेथेही तुम्हाला मदत न मिळाल्यास सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम किसान हेल्प डेस्क (PM-KIS-N Help Desk) च्या ई-मेल (pmkisan-ictgov.in)द्वारे तुम्ही संपर्क करू शकता. या पर्यायाद्वारेही तुम्हाला योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यास 011-23381092 (Direct HelpLine) या क्रमांकावर संपर्क साधावा. या योजनेच्या वेलफेअर सेक्शन मध्येही तुम्ही संपर्क करू शकता.

011-23382401 हा दिल्लीतील फोन क्रमांक तर (pmkisan-hqrsgov.in) ई-मेल आयडी आहे.