Breaking News

पतीचे तुकडे-तुकडे करून 70 किलोमीटवर फेकले:

नवी दिल्ली
संपूर्ण देशाला हादरवून टाकणार्‍या एका प्रकरणाचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 2011साली अपहरण आणि हत्येच्या प्रकरणाचा पोलिसांनी तब्बल 9 वर्षांनंतर छडा लावला आहे. या सगळ्या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 22 वर्षाचा रिक्षाचालक रवी याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल आता 9 वर्षानंतर पोलिसांना त्याच्या मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीची हत्या पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून करण्यात आली आहे. हे प्रकरण सुरू झालं 2010पासून, जेव्हा आरोपी कमलचं त्याच्या शेजारी राहणार्‍या शकुंतलाशी प्रेमसंबंध जुळले. शकुंतलाचेही कमलवर प्रेम होते. त्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं पण शकुंतलाच्या कुटुंबीयांकडून नकार देण्यात आला.

प्रेमविवाहास नकार दिल्यानंतर आरोपी शकुंतलाचा विवाह रिक्षाचालक रवीशी लावून देण्यात आला. रिक्षा चालवून रवी घर चालवायचा. लग्नानंतर शकुंतला एकही दिवस सासरी राहिली नाही. लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी ती माहेरी आली आणि तिची गाठ कमलशी झाली. त्यानंतर दोघांनी मिळून त्यांच्या प्रेमाच्या मध्ये असलेला काटा बाजूला करण्याचा प्लान केला.

पतीला मारण्यासाठी शकुंतला सासरी गेली. बाहेर जाऊ यात म्हणून तिने रवीला कमलच्या गाडीत बसवलं आणि दोरीने त्याचा गळा आवळून हत्या केली. याबद्दल कोणालाही काही कळू नये यासाठी त्यांनी रवीचा मृतदेह पुरला. पण त्यानंतर त्याची शोधाशोध सुरू झाल्यामुळे कमलने त्याचा पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला आणि त्याचे तुकडे करून 70 किलोमीटरवर पुरले.या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस रवीचा शोध घेत होती. अखेर 9 वर्षांनंतर पोलिसांना रवीच्या मृतदेहाचा शोध घेण्यात यश आलं असून आता पुढील तपास सुरू आहे.