Breaking News

आईच्या लिव्ह-इन पार्टनरने केला 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

राजस्थान 
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात बलात्काराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. अलवर जिल्ह्यात चोवीस तासांत दोन मुलींवर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे समोर आली. काही दिवसांपूर्वी बलात्काराची घटना घडली होती, परंतु सीसीटीव्ही फुटेज 9 ऑक्टोबर रोजी समोर आलं. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या एका तरुणाने महिलेच्या 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. जखमी अवस्थेत पीडित चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

पीडित मुलीवर बलात्कार झाला त्यावेळी मुलीची आई घरी नव्हती. ती कामावर गेली होती. पीडित मुलीला जखमी अवस्थेत अलवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना उद्योग नगर पोलिस स्टेशन परिसरातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची आई कारखान्यात काम करते आणि तिला चार मुलं आहेत.

रक्ताच्या थारोळ्यात मुलगी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी आई घरी आली तेव्हा मुलगी रस्काच्या थारोळ्यात पडली होती. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आईने मुलीला अलवर रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली आणि प्राथमिक उपचारानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली. महिला पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि नंतर पीडित मुलीचा जबाब घेण्यात आला.

एका वर्षापासून लिव्ह-इन पार्टनर

आरोपीने मुलीच्या आईचा लिव्ह-इन पार्टनर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे दोघे गेल्या एक वर्षापासून एकत्र राहत होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, उपचारानंतर मुलाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. डीएसपी दीपक शर्मा यांनी सांगितले की, पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतलं आहे.