Breaking News

आत्मा मालिकमध्ये वाचन दिन उत्साहात

कोपरगाव/प्रतिनिधी
आत्मा मालिक ध्यानपीठ संचलित आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलात भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी वाचन प्रेरणादिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गुरुकुलात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

  सुरुवातीला बॅंन्ड पथकासह ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यात विद्याथीनिर्मित घोशवाक्यांचे फलक व कलामांच्या स्फूर्तिदायी विचारांची आरास मांडण्यात आली होती. याप्रसंगी व्यासपीठावर गुरुकुलाचे प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रमेश कालेकर, पर्यवेक्षक बाळासाहेब कराळे, रवींद्र देठे, सुनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने गुरुकुलातील ग्रंथालय विभागाच्या वतीने ‘चला पुस्तक वाचूया’ या अंतर्गत ‘वाचन कट्टा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध प्रेरणादायी पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

   यावेळी प्राचार्य निरंजन डांगे म्हणाले, विद्यार्थ्याने पुस्तकांशी मैत्री करायला हवी. वाचन संस्कृती रुजवायला हवी. जी माणसं आपल्या कार्यकर्तृत्वाने मोठी झाली त्याच्या जीवनात पुस्तकांचे स्थान अढळ आहे. जर यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येकाने वाचनाची सवय जोपासली पाहिजे. असे विचार मांडत प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर पाटील व प्रणव बोरसे या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुकुलातील सांस्कृतिक विभाग प्रमुख रोहिणी सूर्यवंशी, आनंदराव पद्मर, गणेश कांबळे, अविनाश चौधरी, शुदोधन ससाणे, अनंत कोरे, रिना मतसागर आदींनी परिश्रम घेतले.