Breaking News

कोपरगावात सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार

 कोपरगाव / ता.प्रतिनिधी

 कोपरगावचे उपनगर असलेल्या संजयनगर येथील रहिवाशी असलेल्या व बालवाडीत शिक्षण घेत असलेल्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दि. २ ऑक्टोबर रोजी अत्याचार झाल्याची घटना घडली. घराशेजारीच राहणारा आरोपी निहाल अजीज शेख याने टाटा मॅजिक गाडीत मैत्रिणी सोबत खेळत असलेल्या मुलीवर बलात्कार केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

 सदर पीडित मुलगी हि शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या बालवाडीत शिक्षणासाठी सकाळी आठ वाजता आपल्या घरातील नातेवाईकांसोबत जाते. अकरा वाजेच्या सुमारास परत येते. दोन ऑक्टोबरला ती नेहमी प्रमाणे शाळेत जाऊन आली व सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ती घरामागील उभ्या असलेल्या टाटा मॅजिक या प्रवासी वाहनात बसून आपल्या अन्य मैत्रिणींसोबत खेळत असताना त्याच गाडीत शेजारचा आरोपी निहाल अजीज शेख याने तिच्याशी गोड बोलून अत्याचार केला. दुसऱ्या तिच्या वागण्यात झालेल्या बदलावरून तिच्या आजीच्या ही गोष्ट लक्षात आली.  नंतर सदर मुलीचे आई व वडील सायंकाळी कामावरून घरी आल्यावर त्यांच्या निदर्शनात आणून दिला. त्यांनतर त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गु.र.नं.३७६/२०१९,भा.द.वि.कलम ३७६,व बाल लैंगिक अपराधां पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३,४ प्रमाणे दखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप बोरसे हे करत आहे. त्यांनी सदरच्या आरोपीस रात्रीच अटक केली असून घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.