Breaking News

सहायक आयुक्तपदी सारीका थोरात

अहमदनगर/प्रतिनिधी
येथील सारीका थोरात यांची महाराष्ट्र शासन कामगार विभाग कल्याण येथे सहायक आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे. त्यांनी कल्याण येथे पदभार स्वीकारला असून, यापूर्वी त्यांनी नाशिक येथे कामगार अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दिलीप थोरात यांच्या त्या स्नुषा आहेत. त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2011 मध्ये निवड झाली होती. त्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल अभय आगरकर, बाळासाहेब पवार, विनीत पाउलबुधे, निखील वारे यांनी अभिनंदन केले.