Breaking News

शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य

अहमदनगर/प्रतिनिधी
सध्या सर्वत्र निवडणुकांची धामधूम आहे. अशा परिस्थितीत शहरी समस्यांकडे उमेदवारांचे दुर्लक्ष होत चालल्याचे रस्त्यांवरील खड्ड्याच्या समस्येवरुन दिसून येत आहेत. शहरातील रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य असून साधारणपणे नीलक्रांती परिसरातील न्यू लॉ कॉलेजजवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहनचालकांची या परिसरातून मोठी त्रेधातिरपीट उडत आहे. रस्त्याच्या या समस्येकडे मनपाने लक्ष देण्याची मागणी परिसरातून नागरिकांतून होत आहे.