Breaking News

स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत भारताची मोठी घसरण

नवी दिल्ली
आयएमडी च्या जागतिक स्पर्धात्मक क्रमवारीत भारताची 9 स्थानांनी घसरण झाली आहे. यामुळे भारत आता 58 व्या स्थानावरून 68 व्या स्थानी पोहचला आहे. इतर देशांच्या अर्थव्यस्थेतही बदल झाला आहे. यामध्ये अमेरिकेला त्यांचं पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. त्यांच्या जागी सिंगापूरने बाजी मारली आहे. व्यापारयुद्धाचा फटका अमेरिकेला बसला आहे. सिंगापूरने अमेरिकेला मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर हाँगकाँग तिसर्‍या आणि नेदरलँड चौथ्या स्थानी आहे. भारताची ही 10 स्थानांची घसरण केंद्र सरकारच्या दृष्टीने चांगली नाही.

जागतिक आर्थिक मंचाच्या ताज्या अहवालानुसार भारत याआधी स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेच्या यादीत 58 व्या स्थानावर होता. मात्र, यावर्षी भारत ब्राझीलसह ब्रिक्स देशांमध्ये सर्वात खराब कामगिरी करणार्‍या अर्थव्यवस्थापैकी एक बनला आहे. ब्राझील या यादीमध्ये 71 व्या स्थानी आहे. भारताच्या बँकिंग सेक्टरमध्ये समस्या असल्याचंही नमूद केलं आहे.

भारताची  स्थिती खराब

ब्रिक्स देशांपैकी चिन या यादीत सर्वात वरती आहे. चिन 28 व्या क्रमांकावर आहे. तर व्हिएतनाम मोठी झेप घेत 67 व्या स्थानावर पोहचले आहे. 2017 मध्ये भारत 45 व्या तर 2016 मध्ये 41 व्या क्रमांकावर होता.

कार्पोरेट गव्हर्नन्सच्या बाबतीत मात्र भारताने 15 वे स्थान पटकावले आहे. नाविण्यपूर्ण निर्मितीमध्ये भारत वरच्या क्रमांकावर आहे. नवीकरणीय उर्जा आणि मार्केट साइजमध्ये भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. आरोग्यपूर्ण जीवन जगण्याच्या बाबतीत भारत पहिल्या शंभर देशांमधून बाहेर आहे. एकूण 141 देशांच्या या यादीत भारत 109 व्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेबाहेरील देशांमध्ये ही वाईट परिस्थिती आहे. दक्षिण आशियातील इतर देशांच्या तुलनेतही खालचा क्रमांक आहे.

स्पर्धात्मक क्रमवारी

जागतिक स्पर्धात्मक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीला 1979 पासून सुरुवात कऱण्यात आली. त्यामध्ये 141 देशांचा समावेश आहे. कोणत्याही देशाच्या दीर्घकालीन आर्थिक वाढीसाठी स्पर्धात्मकता महत्वाचा घटक मानला जातो. यामुळे शाश्‍वत वाढ, रोजगार निर्मिती, नागरिकांचे कल्याण यावर मोठा परिणाम होतो. जवळपास 235 घटकांचा विचार करताना निकषांच्या आधारे क्रमवारी निश्‍चित केली जाते.